स्वामी विवेकानंद ई-टेस्ट-2024
आदरणीय महोदय ,
दरवर्षी प्रमाणे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था हि राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकांनद यांची जयंती आपण सर्वजण साजरी करत असतो , याचाच भाग म्हणून स्वामींबद्दल ची माहिती प्रत्येक युवाला व्हावी या अनुषंगाने आम्ही विवेकानंदांच्या जीवनावर आधारित ई -टेस्ट 2024 चे आयोजन केले आहे , हि टेस्ट पूर्णपणे मोफत असून परिक्षेचा अभ्यास होण्यासाठी या विषयीचे एक पुस्तकही मोफत देत आहोत . या वर विद्यार्थ्याने दिनांक 07 जानेवारी 2024 , रविवार रोजी हि टेस्ट सकाळी ११:०० ते ०१:०० च्या दरम्यान द्यायची असून याचा निकाल हा दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर केल्या जाईल व तसेच आपल्या शाळेमधील पहिल्या दोन विध्यार्थ्यांना दिनांक १२ जानेवारी २०२३ , राष्ट्रीय युवा दिन , शुक्रवार रोजी बक्षीस वितरण केले जाईल , तरी आपण या ई - टेस्ट मध्ये सहभाग नोंदवून सहकार्य करावे .टीप : सोबत १५ पुस्तके देत असून त्याचा वापर वाचनासाठी करावा तसेच वाचन झाल्यावर पुस्तके आपल्या शिक्षक कॉर्डीनेटर कडे जमा करावे. प्रत्येक शाळेतील विध्यार्थी नोंदणी संख्या किमान 30 किंवा अधिक असावी.
Tags:
etest